प्रा. वा. ल. कुळकर्णी हे विसाव्या शतकातील मराठीमधील प्रथितयश प्राध्यापक आणि समीक्षक होते. त्यांचा गौरव करण्यासाठी “साहित्य : अध्यापन आणि प्रकार” हा ग्रंथ श्री. पु. भागवत आणि इतर यांनी संपादित करून पाॅप्युलर आणि मौज या प्रकाशन गृहांनी एकत्रित येऊन १९८६मध्ये प्रसिद्ध केला.
या ग्रंथामध्ये “साहित्यप्रकार” या संकल्पनेचा आधुनिक तत्त्वज्ञान व संरचनावादी सौंदर्यशास्त्राच्या अंगाने विचार करणारा प्रा. मिलिंद मालशे यांचा हा मराठीतील एक महत्त्वाचा लेख आहे.

या लेखातील सर्वात लक्षणीय भाग म्हणजे “साहित्यिक क्षमता” (Literary Competence”) आणि साहित्यप्रकार म्हणजे लेखक व वाचक यांच्यातील “करार” (contract) यांची चर्चा होय. प्रा. मालशे यांच्या मांडणीनंतर या संकल्पना मराठी समीक्षेत रुळल्या.
या लेखाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे:
१. संकल्पना, वर्गीकरणे व कला
२. वर्गीकरणाचे सौंदर्यशास्त्रीय विचार
२.१. नाममात्रवादी भूमिका : कांट व क्रोचे
२.२. परंपराभिमुख भूमिका
३. वर्गीकरणाची संकल्पना साहित्यप्रकार
३.१. साहित्यिक क्षमता
३.२. पायाभूत साहित्यिक करार
३.३. करवारव्यवस्था व प्रकारव्यवस्था