ॲलन डेव्हिड सोकल हे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे गणित या विषयाचे प्राध्यापक असून न्यूयॉर्क विद्यापीठात पदार्थविज्ञान या विषयाचे इमेरिटस प्राध्यापक आहेत. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उत्तराधुनिक विचारवंतांनी वैज्ञानिक ज्ञानाला संस्कृतीसापेक्ष व इतिहाससापेक्ष ठरविण्याचे जे प्रयत्न केले, त्यांचे साधार आणि मुळापासून खंडण करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये सोकल यांची गणना होते. प्रत्यक्ष कृतीद्वारे आपले मत प्रस्थापित केल्यानंतर जीन ब्रिकमॉन्ट यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी अनेक आघाडीच्या उत्तराधुनिक विचारवंतांनी वैज्ञानिक संकल्पना कशा विकृत करून मांडल्या आहेत याची विस्तृत मांडणी केली. पीटर क्रेको या हंगेरियन विचारवंताने घेतलेली सोकल यांची मुलाखत युरोझीन या व्हिएन्नामधून प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकात ऑगस्ट २०२२ मध्ये प्रसिद्ध झाली. या मुलाखतीचे भाषांतर डॉ. मिलिंद मालशे यांनी ‘तळटीप’च्या वाचकांसाठी ‘वस्तुनिष्ठ जगाचे समर्थन’ या शीर्षकांतर्गत केले आहे. या भाषांतरित मुलाखतीत वस्तुनिष्ठता आणि सत्य या संकल्पनांचा विज्ञानाशी असणारा संबंध ध्यानात घेऊन कोविड महामारीच्या जागतिक पार्श्वभूमीवर काही शासकीय धोरणांची आणि निर्णयांचीही चिकित्सा केलेली आहे.
छापील किंमत ₹४००/- प्रकाशनपूर्व सवलतीची किंमत ₹३५०/-.
भाषा, भाषाविज्ञान आणि भाषाभ्यास ह्या विषयांचा परिघ असलेले ‘तळटीप’ षण्मासिक. त्यातल्या लेखांविषयीची ही संक्षिप्त माहिती. भाषेत स्वारस्य असणार्या मित्रमंडळींनाही पाठवावे.
तळटीप खंड १ – ऑगस्ट २०२५ मधे प्रकाशित होत आहे. मर्यादित प्रती उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी कृपया ईपत्त्यावर संपर्क करावा.
taltipfootnote at gmail dot com