भाषाविज्ञान हे आधुनिक काळातील एक अत्यंत महत्त्वाचे विज्ञान मानले जाते. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे, गेल्या सुमारे पन्नास वर्षांत या शास्त्राने जी सैद्धांतिक प्रगती केलेली आहे, तिची बरोबरी करणे इतर सामाजिक विज्ञानांना जमलेले नाही. विसाव्या शतकाच्या प्रारंभी फेर्दिनां द सोस्यूर या स्विस भाषाभ्यासकाने संरचनावादी व वर्णनात्मक विश्लेषणपद्धतीचा पाया घातल्यानंतर त्यावर भाषाविज्ञानाची भक्कम इमारत उभी करण्याचे कार्य युरोपीय व अमेरिकन अभ्यासकांनी केलेले आहे. सोस्यूरने भाषेचा विचार अधिक व्यापक अशा चिन्हव्यापाराच्या संदर्भात केल्याने चिन्हमीमांसेची चर्चाही नव्याने सुरू झाली. दुसरे म्हणजे, भाषावैज्ञानिक सिद्धांतांचे व विश्लेषणाचे उपयोजन इतर अनेक क्षेत्रांमध्ये फार व्यापक प्रमाणात होऊ लागले. समाजविज्ञान, मनोविज्ञान, भाषाध्यापन, भाषांतर, संगणकविज्ञान, संगणनात्मक बुद्धिकौशल्यांचा अभ्यास करणारे विज्ञान (Artificial Intelligence) इत्यादी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांत भाषाविज्ञानाचा उपयोग करून संशोधन होत आहे. प्रस्तुत ग्रंथामध्ये भाषाविज्ञानाच्या या दोन्ही पैलूंची चर्चा केलेली आहे.
आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन । मिलिंद स. मालशे । सातवी आवृत्ती
पाने : ३७२ । किंमत : ४५०/-
अमेझॉन लिंक : https://www.amazon.in/dp/8186995056?ref=myi_title_dp
संपर्क : ८४५४०४९०३६ । ०२२-२४३७६०४२
